7.5 C
New York
Thursday, April 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

जालना-बीड रोडवर बस-कंटेनरचा भीषण अपघात 6 जणांचा मृत्यू, 18 जखमी 6 जणांची प्रकृती गंभीर

जालना वार्ताहर

जालना जिल्ह्यातील जालना वडीगोद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये 6 जण ठार झाले असून 18 जण जखमी झालेत जखमी पैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.दरम्यान अंबाजोगाई महामंडळाची बस होती ती जालन्याला जात होती.अंबडपासून 10 किमीवर झालेल्या या अपघातामुळे जालना-बीड मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातग्रस्त ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जालना-बीड रोडवर बस-कंटेनरचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 18 जखमी 6 जणांची प्रकृती गंभीर

जालना बीड मार्गावरील शहागडजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर तातडीने स्थानिक त्यांच्या मदतीला धावले.घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. नक्की अपघात कसा झाला ही माहिती अजून ही पुढे आली नाही.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बस ला जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरा समोर धडक बसली , प्रत्यक्षदर्शी च्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण 24 प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!