घाटनांदुर ते चोपनवाडी दरम्यान 13 लाखाचा गांजा अंबाजोगाई पोलिसांनी रंगेहात पकडला
2 आरोपी पळाले 3 संशयित ताब्यात घेतले
बीड प्रतिनिधी
दिनांक 19/09/2024 रोजी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, यांना गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, घाटनांदुर ते चोपनवाडी जाणारे रोडच्या बाजुला काही इसम विना परवाना बेकायदेशीररित्या गांजा सदृश पाला कब्जात बाळगुन बसले आहेत. त्यावरुन त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी पथक नेमुन छापा टाकण्यासाठी पथक रवाना केले. नमुद पथकाने घटनास्थळावरील पाचपैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून दोन संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. ज्या तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून जवळपास 13 लाख रुपयांचा गांजा अंबाजोगाई पोलिसांनी जप्त करून मोठी कारवाई केली आहे.या कारवाईने गांजाचा अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या ठिकाणी छापा टाकला असता पाच इसम सहा पिशव्या कब्जात बाळगतांना दिसले. छापा पथकास पाहुन नमुद पाच पैकी 2 इसम पळून गेले तर छापा पथकाने 3 संशयीत नामे 1) अनिल कांताराम जाधव वय 22 वर्षे, रा. पोखरी रोड, राधानगरी, अंबाजोगई उर्फ शेख सोहेल शेख खलील वय-22 वर्षे, रा. सातोना, ता. परतुर जि. जालना, 2) प्रतिक भेटु मंडल वय-19 वर्षे, रा. गरशामा जि. मुर्शीदाबाद पश्चिम बंगाल, 3) आजयमाल रपनमाल वय-26 वर्षे, गोकुलता पोस्ट खेरुर जि. मुशीदाबाद पश्चिम बंगाल यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे असलेल्या पिशव्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 120 किलो 83 ग्रॅम वजनाचा एकुण 12,77,900/- रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सपोनि महेंद्रसिंग ठाकुर यांच्या फिर्यादीवरुन एकुण सहा आरोपींविरुद्ध अंबाजोगई ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नं. 280/2024 कलम 20(बी) गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारा पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींचा शोध अंबाजोगई ग्रामीण पोलीस घेत आहेत.
सदर यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री. रामराव पडवळ सपोनि. श्री. महेंद्रसिंग पडवळ, आर. एल. घुगे, समाधान कवडे, पोह/2125 भागवत, पोह/395 देशमाने, पोह/1387 अशोक फड, पोह/ 1745 उळे पोलीस ठाणे अंबाजोगई ग्रामीण तसेच पोह/1577 तागड, पोह/1307 राठोड, पोह/1781 सिद्धेश्वर पोह/692 दौंड सर्व नेमणुक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय अंबाजोगई यांनी केली आहे.