झम झम कॉलनीतील महिलांनी राष्ट्रवादीला साथ देण्याचा केला निर्धार – सय्यद फातिमा
बीड प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा एक खंबीर आणि बळ देणारे नेतृत्व आहे. त्यामुळेच येणाऱ्या आगामी काळात अल्पसंख्यांक महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी दादांच्या राष्ट्रवादीला खंबीरपणे साथ देण्याचा निर्धार झमझम कॉलनी येथील बैठकीत अल्पसंख्यांक महिलांनी जाहीरपणे केला. असा दावा कार्यक्रमाच्या आयोजक सय्यद फातेमा यांनी व्यक्त केला.
बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर आणि डॉ.सारिका ताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्य घड्याळ आणि मानवी साखळी कार्यक्रम महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक महिला तालुका अध्यक्ष सय्यद फातेमा यांनी आयोजन करून राबवला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हा अध्यक्ष प्रज्ञाताई खोसरे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शेख शाकेरा , जिल्हा सचिव अनुराधा प्रकाश , शहर कार्य अध्यक्ष वंदना देशमुख , शहर अध्यक्ष पूनम वाघमारे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणलेल्या सर्व योजनांची माहिती दिली आणि येणाऱ्या काळात सर्व महिला ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट यांच्या पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही दिली. यावेळी अल्पसंख्याक पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी सय्यद फातेमा यांनी अजित दादा यांनी आणलेल्या योजनेची माहिती दिली. येणाऱ्या काळात सर्वांनी मिळून दादाच्या पाठीशी उभे रहायचे असे आश्वासन अल्पसंख्याक महिला तर्फे देण्यात आले.