11 C
New York
Sunday, April 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीस 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीस 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

 

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर साहेब यांचा महत्वपूर्ण निकाल

बीड राजयोग प्रतिनिधी

गेवराई तालुक्यतील एका गावातील अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी किरण कांबळे याला दोषी ठरवुन ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, गेवराई तालुक्यातील एका गावात पिडीता ही तिच्या आजी व आजोबा सोबत घराच्या बाहेर अंगणात झोपली असता रात्री तेथे येवुन आरोपीने पिडीता झोपलेली असता वाईट हेतुने तिचा विनयभंग केला. पिडीता जागी होवून ओरडली असता आरोपी तेथुन पळुन गेला. त्यानंतर पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन चकलांबा येथे आरोपी विरूद्ध कलम ३५४(ड) भादवी व पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

प्रकरणात तपासाअंती पोलीसांनी सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय यांचे कोर्टात दाखल केले होते. सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणात पिडीत मुलीची साक्ष महत्वाची ठरली व तिने आरोपीला न्यायालयात ओळखले. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेला भक्कम पुरावा व सहा. सरकारी वकिल अँड. मंजुषा दराडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आनंद एल यावलकर साहेब यांनी आरोपीस कलम ८ पोक्सो कायद्यान्वये दोषी ठरवुन ३ वर्षे सक्त मजुरी व रू. १००० दंडाची शिक्षा ठोठावली तसेच कलम १२ पोक्सो कायद्यान्वये एक वर्ष सक्त मजुरी व ५००/- दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता अँड. मंजुषा एम. दराडे यांनी कामकाज पाहिले त्यांना अँड. बी.एस. राख व पैरवी अधिकारी म्हणुन श्री नागमवाड व श्री मिसाळ यांनी सहकार्य केले.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!