7.5 C
New York
Thursday, April 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

केज राखीव मतदार संघातून पत्रकार वैभव स्वामी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

केज राखीव मतदार संघातून पत्रकार वैभव स्वामी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

केज राजयोग प्रतिनिधी

दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांनी केज राखीव विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज 29 ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्वाचन अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.

232 केज राखीव मतदार संघात मागील पंचवार्षिक 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पत्रकार वैभव स्वामी यांना सोशल इंजिनिअरिंग म्हणून वंचित बहुजन आघाडीने उमेदवार म्हणून संधी दिली होती. पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी प्रामाणिकपणे लढत दिली. मतदारांसाठी नवा राजकीय चेहरा असताना देखील मतदार संघातील तब्बल दहा हजार मतदारांनी त्यांना आपले अमूल्य मत देत आमदार म्हणून स्वीकारले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पत्रकार वैभव स्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीत रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकारण कोणत्या वळणावर जाईल आणि कोणत्या उमेदवाराचे भाग्य उजळेल हे येणारा काळच ठरवेल.

 

चौकट..

केज मतदार संघाचे पहिले आमदार स्वामी होते…

केज विधानसभा मतदारसंघ 1952 मध्ये अस्तित्वात आला.त्या वेळी पहिल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी रामलिंग स्वामी यांना संधी देण्यात आली होती.मतदारांनी त्यांना नवखे असताना देखील आमदार म्हणून स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर या मतदारसंघातील जागरूक मतदारांनी यानंतर गंगाधर स्वामी यांच्या रूपाने दोन वेळा स्वामींना संधी दिली होती. लिंगायत समाजाचे तत्कालीन उमेदवार देवेंद्र शेटे यांचा पराभव देखील निसटता झाला होता. त्यांना देखील मतदाराने जवळपास आमदारकीच्या उंबरठ्यावर नेलेले होते. त्यामुळे या मतदारसंघाने लिंगायत समाजाला कायम झुकते विजयी माप दिलेले असल्याने या मतदारसंघातील जागरूक नागरिक पुन्हा एकदा अशक्य ते शक्य करतील स्वामी… आणि कहो दिल से स्वामी फिरसे… असे आत्ताच नारा देत आहेत. राखीव मतदार संघ म्हणून केज मतदार संघाची ही कदाचित शेवटची निवडणूक असेल. यानंतर राखीव मतदार संघ बदलला जाईल. त्यामुळे पहिले आमदार स्वामी होते आणि राखीव मतदारसंघाचे शेवटचे आमदार सुद्धा स्वामी होतील का ? अशी चर्चा रंगत आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!