पालीच्या तलावात अनोळखी डेड बॉडी सापडली
बीड – शहरापासून जवळ असलेल्या बिंदुसरा पालीच्या धरणामध्ये एका अनोळखी इसमाचे प्रेत 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आढळून आले आहे.
सदरील डेड बॉडी इसमाचे असून साधारण 45 ते 50 वयोगटातील इसम आहे. सदरील इसमास कोणी ओळखत असेल तर बीड ग्रामीण पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.सदरील डेड बॉडी स्थानिक रहिवाशांच्या नजरेस आल्याने ती बाहेर काढण्यात आली. सदरील इसमाचा शोध घेतला जात आहे.