मिलिया कॉलेज समोर प्रजासत्ताक दिनापासून जरीउल्ला खान कुटुंबीयांचे बेमुदत उपोषण
मी 18 वर्षापासून नोकरी करत आहे मला आता तरी नोकरी द्या – जरीउल्ला खान
बीड प्रतिनिधी
मिलीया हायस्कूल व जुनियर अँड सीनियर कॉलेज, अंजुमन ईशाद तालीम बीड अंतर्गत मागील 18 वर्षापासून प्रयोगशाळा परिचर म्हणून सेवा करत असलेल्या जरीउल्ला खान अमानुल्ला खान यांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात आलेले नाही. 1000 रुपयाच्या तुटपुंज्या मानधनावर त्यांना राबवून घेतले आहे. मुख्याध्यापक आणि संस्थेच्या संचालक मंडळांनी वारंवार खोटी आश्वासने दिल्यामुळे जरीउल्ला खान यांनी मिलीया कॉलेज समोर आपल्या कुटुंबासह प्रजासत्ताक दिनापासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तरीदेखील त्यांच्या उपोषणाची दखल मिलिय्या कॉलेज आणि संस्था घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिलीया हायस्कूल व जुनियर अँड सीनियर कॉलेज येथील सेवक तथा प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेल्या जरीउल्ला खान अमानुल्ला खान यांनी नोकरीवर कायम करावे या मागणीसाठी 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की मागील 18 वर्षापासून मी सेवक प्रयोगशाळा परिचर म्हणून मीडिया हायस्कूल व ज्युनियर अँड सीनियर कॉलेजमध्ये काम करत आहे मुख्याध्यापक आणि संस्थेच्या चेअरमन सह संस्थाचालकांनी मला वेळोवेळी कायम करण्याच्या खोट्या आश्वासनाने दिशाभूल केली आहे.मागील 18 वर्षापासून तुटपुंजा अवघ्या एक हजार रुपये पगारावर राबविण्यात आले आहे मी वेळोवेळी कायम करण्याच्या विनंत्या केल्या पण टाळाटाळा करण्यात आली 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच मागणीसाठी उपोषण केले होते त्यावर त्यांनी संबंधित संस्थेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मी उपोषण सोडले होते मागील सहा महिन्यांमध्ये यासंदर्भात कोणतेही कारवाई पुढे झाली नाही उलट उपोषणानंतर मला संस्थेमध्ये संस्थाचालक मुख्याध्यापक इतर कर्मचारी कोणीही बोलण्यासही तयार होत नाही. माझे वयोवृद्ध आई पत्नी आणि मुलांची जबाबदारी माझ्यावर असून तुटपुंजा एक हजार रुपये पगारावर माझ्या कुटुंबाचे पालन पोषण होऊ शकत नाही माझ्यावर आणि कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आल्यामुळे मला पुन्हा एकदा 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनापासून मिलिया हायस्कूल व ज्युनिअर महाविद्यालय बीड समोर उपोषण करण्याची वेळ आली आहे. माझे काही बरे वाईट झाले तर त्यास सर्वस्वी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक जबाबदार राहतील. माझी मागील 18 वर्षाची प्रामाणिक सेवा गृहीत धरून मला संस्थेने नोकरीमध्ये कायम करावे आणि न्याय द्यावा अशी मागणी जरीउल्ला खान अमानुल्ला खान यांनी मुख्याध्यापक आणि चेअरमन यांच्याकडे केली असून त्याच्या प्रति मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, सहसंचालक पुणे, सहसंचालक संभाजीनगर, जिल्हाधिकारी बीड, शिक्षणाधिकारी बीड आणि संबंधित पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे.
चौकट…
मिलिया महाविद्यालय पुन्हा एकदा वादाच्या भौऱ्यात
मिलिया महाविद्यालयातील सावळा गोंधळ राज्यभर नव्हे तर देशभर गाजला होता. त्या प्रकरणावरून मिलीयाच्या व्यवस्थापनाचे धज्जे उडाले होते. आता याच मिलीय्या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील जरीउल्ला खान अमानोल्ला खान हे मागील 18 वर्षापासून सेवक प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्य करत असताना देखील त्यांना नाम मात्र एक हजार रुपये मानधन दिले जात आहे. त्यांना वारंवार नोकरीवर कायम करण्याचे फक्त आश्वासन दिले जाते. मात्र ते पाळले जात नाही हे वास्तव आहे. त्यांना हक्काच्या नोकरी पासून दूर ठेवणाऱ्या मध्ये नेमका नतदृष्ट कोण हे शोधणे गरजेचे ठरणार आहे.