माहेरजवळा ग्रामपंचायतीत १५ वित्त आयोगातून लाखोचा भ्रष्टाचार,माहिती देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ
घनसावंगी प्रतिनिधी/घनसावंगी तालुक्यातील माहेरजवळा या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी १५ वित्त आयोगामधून ग्रामपंचायत सदस्यांना विचारात न घेता व एकही मासिक सभा न घेता परस्पर १५ वित्त आयोगाचा निधी लाटला असून बोगस कामे करून लाखोचा भ्रष्टाचार करून केलेल्या कामाची माहिती ग्रामसेवक देत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य संजय पांडुरंग राठोड यांनी निवेदनाव्दारे गटविकास अधिकारी पंचायत समिती घनसावंगी यांच्याकडे केला असून सन २०२१ पासून आजपर्यंत १५ वित्त आयोगातून कोणत्या कामावर किती निधी खर्च झाला याची इस्टीमेंट,मोजमाप पुस्तिका व जिओ टॅग फोटोसहीत माहिती देण्यात यावी व झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषीकडून अपहार केलेल्या रक्कमेची वसुली करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात याची नसता पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य संजय पांडुरंग राठोड व बबन उत्तम पवार यांनी दिला आहे