अल्फिया सोहेल शेख *हिचा जीवनाचा पहिला रोजा*
जाफराबाद प्रतिनिधी :- पवित्र रमज़ान महिन्याला सुरू झाला आहे असुन या महिन्यामध्ये रोजे, तरावीह ची नमाज़, व ईबादत करतात इस्लाम धर्मामध्ये रमज़ान महिन्याला अत्यंत महत्वाचे मानले जाते.असेच जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथील अल्फिया सोहेल शेख (वय ७ वर्ष) या छोट्या चिमुकली ने, आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केले सध्याचे तापमान आणि रखर खत्या उन्हात पहाटे पाच वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत अन्नाचा एक ही कण आणि पाण्याचा एक ही थेंबही न घेता दिवसभर उपाशी राहून त्यांनी अल्ला प्रति आपली श्रद्धा व्यक्त केली कमी वयात जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल आई वडील काका काकी यांच्या कडून अल्फिया सोहेल शेख हिचे रोजा ठेवल्याने चिमुकली चे कौतुक व अभिनंदन होत आहे