11 जून रोजी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
इयत्ता 10 वी आणि 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी
बीड प्रतिनिधी
इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण घेतले आहेत.अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते 11 जून रोजी करण्यात येणार आहे. या पुरस्कारास पात्र गुणवंत विद्यार्थ्यांनी 8 जून पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमजद पठाण, शेख ताहेर, अँड.विनायक जाधव आणि शेख आयेशा यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे सर, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या पुढाकारातून बीड जिल्हा शाखेच्या वतीने इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 85 टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेले आहेत.अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, समाजसेवक यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, पेन, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सदरील सत्कार सोहळा बुधवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.या सत्कारास पात्र असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले नाव 70 30 14 93 22 या व्हाट्सअप नंबर वर मार्क्स मेमोची कॉपी, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर आणि संपर्क पत्ता पाठवून नोंदणी करावी. त्याचबरोबर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ, पेन आणि सन्मानपत्र स्वीकारण्यासाठी आपल्या मित्रपरिवार आणि पाल्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे बीड जिल्हाध्यक्ष अमजद खान पठाण, पत्रकार हल्ला कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष शेख ताहेर, बीड जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अँड विनायक जाधव आणि महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा, डिजिटल मीडियाची जिल्हाध्यक्ष अनिल आगुंडे, जिल्हा सचिव शेख वसीम, जिल्हा उपाध्यक्ष शेख आयुब, जिल्हा संघटक रईस खान, पत्रकार हल्ला कृती समिती जिल्हा सचिव शेख अब्दुल, महिला जिल्हा सचिव प्रा. अनुप्रिता मोरे यासह पत्रकार संघ, पत्रकार हल्ला कृती समिती, महिला कार्यकारणी, डिजिटल मीडियाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी केले आहे.
चौकट….
पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया अंतर्गत पत्रकार म्हणून अथवा माध्यमांच्या विविध घटकांमध्ये जे काम करणारे पालक आहेत. त्यांच्या ज्या पाल्यांनी इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेमध्ये 75 टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेले आहेत.अशा सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.
चौकट
सर्व तालुका स्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
बीड जिल्ह्यातील गेवराई,वडवणी, माजलगाव, परळी वैजनाथ , अंबाजोगाई, केज, धारूर, पाटोदा, आष्टी, शिरूर कासार या तालुक्यामध्ये तालुकाध्यक्षांच्या संयोजनातून त्या तालुक्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 85 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेले आहेत अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे. यासंदर्भात तालुकास्तरावरून पुरस्काराचे नियोजन, तारीख आणि वेळ निश्चित होणार असल्याचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.