19 C
New York
Wednesday, August 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

# world heart day# जागतिक हृदयरोग दिवस#

# world heart day# जागतिक हृदयरोग दिवस#

 

हृदयविकारासंबंधित जनजागृती करण्याचा दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा करतात. या दिवसाला जागतिक हृदय दिवस असे संबोधतात. या उपक्रमामध्ये हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो.

जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अधिकतर व्यक्ती हृद् रोहिणी विकार किंवा हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावतात. असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवाप्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत

जागतिक हृदय दिनाचे महत्त्व

हृदय हा मानवी शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, त्याच्या कामात बिघाड झाल्यास मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाने हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि काही जीवनशैलीच्या सवयींबद्दल जागरूकता नसल्यामुळे, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVDs) हे जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. दरवर्षी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगामुळे सुमारे 1.7 कोटी लोकांचा मृत्यू होतो, जो जागतिक मृत्यूच्या अंदाजे 31% आहे.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

बॉडी मास इंडेक्स नियंत्रणात ठेवणे (BMI), BMI श्रेणी – कमी वजन = <18.5, सामान्य वजन = 18.5 – 24.9, जास्त वजन = 25 – 29.9, लठ्ठपणा = 30 किंवा त्याहून अधिक

उच्च रक्तदाब (उच्च रक्तदाब) आणि उच्च कोलेस्टेरॉल (हायपरलिपिडेमिया) वर लक्ष ठेवणे

जास्त सोडियमचा वापर मर्यादित करणे – उच्च रक्तदाबाचा धोका (उच्च रक्तदाब)

प्रारंभिक चिन्हे आणि लक्षणे समजून घेणे आणि कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य कारवाई करणे

बैठी जीवनशैली टाळणे, शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतून सक्रिय जीवनशैलीची निवड करणे

सल्लामसलत आणि जागरूकता कार्यक्रमांद्वारे हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे

निरोगी आणि संतुलित आहार घ्या, ट्रान्स फॅट आणि जंक फूड टाळा

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

तणावाचे व्यवस्थापन करायला शिका आणि दर्जेदार झोप घ्या

व्यायाम आणि हृदयरोग

व्यायामासंदर्भात काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणे प्रत्येकाला आवश्यक आहे. कमीत कमी किती व्यायाम करावा, असा प्रश्न नेहमीच हृदयरोग तज्ज्ञांना विचारल्या जातो. आठवड्यातून पाच दिवस कमीत कमी ३० मिनिटं मध्यम तीव्रतेचा (मॉडरेट इंटेंसिटी) व्यायाम करणे अपेक्षित आहे. म्हणजे असा व्यायाम की, जो करताना व्यक्ती आपल्या भवतालच्या व्यक्तीसोबत बोलू शकतो, त्यास दम लागत नाही. रोज चालणे वा जॉगिंग या व्यायाम प्रकारात मोडते. किंवा आठवड्यातून तीन दिवस २५ मिनिटं थोडा तीव्र व्यायाम करणे अपेक्षित आहे. हा व्यायाम करताना दम लागतो व आपल्या बाजूला असलेल्या व्यक्तीशी बोलणे शक्य नसते. धावणे व जलतरण या व्यायाम प्रकारात मोडतो. शिवाय दोन दिवस वजन उचलून स्वतःच्या क्षमता वाढविण्याचा व्यायामा ज्यास वेट ट्रेनिंग म्हणतात, तो देखील करणे आवश्यक आहे. मात्र, व्यायामाचा अतिरेक व्हायला नको.

 

Dr Sunil Bobade

Mbbs MD DM cardiologist

Medicare heart hospital beed

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!